ऑनलाईन पोर्टल द्वारे बनावट भारतीत मतदान कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड बनविणाऱ्या सेंटर वर कारवाई

पोलीस ठाणे मालवणी पोलीस ठाणे, मुंबई. गु.र.क्र.- 476/2024 कलम- 420, 465, 467, 468 471 भादवी . 

आरोपीचे  नाव मोहसीन मोहमद रफी शेख , 30 वर्ष.धंदा  रा.ठी. म्हाडा, मालवणी मुंबई 

पाहिजे आरोपी तपास चालू 

घटनास्थळ M. S. कन्सलटंट, शॉप न.381, गायकवाडनगर, मालवणी (प) मु.

हकीकत दिनांक 03/04/24 रोजी माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये सपोनी साळुंके व निगराणी पथक हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, वरील घटनास्थळी बनावट मतदान कार्ड/आधारकार्ड/पॅनकार्ड बनविण्याचे सेंटर सुरु आहे. सदर बाबत वरिष्टाना अवगत करून त्यांचे आदेशान्वये सदर ठिकाणी सापळा पंचनाम्या अंतर्गत छापा टाकला असता तेथे वरील इसम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ऑनलाईन पोर्टल चा वापर करून शासकीय दस्तवज बनावट बनवून ती विक्री करताना मिळून आला. पंचांसमक्ष  सदर पोर्टल ची पाहणी केली असता पोर्टल द्वारे बनावट 1)मतदान कार्ड 2) पॅनकार्ड 3)आधारकार्ड 4) रेशनकार्ड 5) ड्रायव्हिंग लायसन्स 6) आयुशमान कार्ड इत्या. भारतीय शासकीय दस्तएवज बनावट बनविण्याचे पेड अप्लिकेशन मिळून आले. सदर अप्लिकेशनची पाहणी केली असता मधे जाऊन हवी ती बनावट माहिती भरून त्यावर येणारा बारकोड स्कॅन करून पैसे भरले असता भरलेल्या माहिती प्रमाणे वरील प्रकारचा बनावट शासकीय दस्तएवज तात्काळ उपलब्ध होताना दिसून आला. 
 
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
1) एक संगणक, कीबोर्ड, माउस 
2) प्रिंटर व राउटर 
3) बनावट शासकीय दस्तऐवज 

तपासी अधिकारी स.पो.नि. निलेश साळुंके 
————————————
 
पथक :- सपोनि निलेश साळुंके, पो.हवा. अनिल पाटील, पो ह बुगडे, पो.शि. अरुण राठोड , पो.शि. विलास आव्हाड, पो. शि. नवनाथ शिंदे, व  पो. शि. सचिन वळतकर.

          आदरपूर्वक 

    ( चिमाजी आढाव )
   वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
    मालवणी पोलीस ठाणे,          
                मुंबई.