THANE POLICE
COMMISSIONERATE
जनसंपर्क अधिकारी कार्यालय,
ठाणे शहर पोलीस
प्रेसनोट
दिनांक २७/०४/२०२४
खंडणी मागणाऱ्या नवीमुंबई महानगर पालिकेच्या माजी नगरसेवकास खंडणी विरोधी पथक, ठाणे
"
यांच्याकडून अटक
दिनांक २६/०४/२०२४ रोजी ठाणे पोलिस आयुक्तालयातील खंडणी विरोधी
पथक, गुन्हे शाखा, ठाणे येथे तक्रारदार इसम नामे त्रिभुवन लालबीहारी सिंग वय ४२ रा.
वाघोबानगर कळवा ठाणे यांना एका कपंनीने एरोली परिसरात खोदकाम करून इंटरनेट केबल
टाकण्याचे कॉन्ट्रक्ट दिले होते. सदरचे खोदकाम सुरू असताना ऐरोली, नवी मुंबई परिसरातील माजी
नगरसेवक एम.के.मढवी यांनी त्रिभुवन सिंग यांना त्यांचे ऑफीसमध्ये बोलावुन तसेच तक्रारदार त्यांच्या
कळवा येथील घरी असताना वारंवार फोन करून ते तेथील नगरसेवक असुन २ लाख ५० हजार
रूपयांची खंडणी मागणी करून पैसे न दिल्यास काम बंद पाडण्याची धमकी दिली. त्या अनुषंगाने
त्यांचे आपसात वेळोवेळी झालेले संभाषण त्रिभुवन लालबीहारी सिंग यांनी त्यांचे मोबाईल फोन द्वारे
रेकॉर्ड केले आहे. तसेच दिनांक २६/०४/२०२४ रोजी अडीच लाखापैकी दीड लाख रूपये आरोपी
मढवी हे तक्रारदार यांच्याकडून घेत असतानाचा व्हीडीओ रेकॉर्ड करून तक्रारदार त्याच दिवशी
२६/०४/२४ रोजी खंडणी विरोधी पथक येथे तक्रार देण्यास आले.
त्यावेळी तक्रारदार यांनी तक्रारीत सांगितलेली हकीकत तसेच सोबत आणलेले
रेकॉर्डिंग पुरावे याआधारे पोलिसांनी कारवाई करण्यासाठी आज दिनांक २७/०४/२०२४ रोजी
सायंकाळी १८:०० च्या सुमारास आरोपी यांच्या ऐरोली येथील पक्ष कार्यालयावर सापळा रचला.
सापळा कारवाई दरम्यान आरोपी नगरसेवक एम.के.माढवी यांनी तक्रारदार त्रिभूवन सिंग यांच्याकडील
एक लाख रूपये त्यांचा ड्रायव्हर अनिल सिताराम मोरे, वय ४९ वर्ष यांच्या मार्फतीने पक्ष कार्यालयात
स्वीकारले आहेत. या कारवाईदरम्यान पोलिस पथकाने माजी नगरसेवक मनोहर कृष्ण मढवी, वय
६४वर्ष, रा. घोटीवली गाव, नगरसेवक, नवी मुंबई महानगरपालिका यांना तसेच त्यांचा चालक अनिल
सिताराम मोरे,वय ४९ वर्ष रा. घोटीवली गाव यांना ताब्यात घेतले आहे.
तसेच नमूद दोन्ही आरोपी यांच्या विरोधात कळवा पोलिस ठाणे येथे भा.दं.वि. कायदा
कलम ३८४,३८५,३८७, ५०६, ५०६ (२), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
सदरचा तपास मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे करीत आहेत.
www cmmnews.in
info@cmmnews.in