मागाठाणे दहीकाला महोत्सव २०२४ निमित्त तारामती चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने आणि राज प्रकाश सुर्वे यांचा पुढाकाराने "कोण होणार मागाठाणेचा रीलस्टार" या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मागाठाण्यातील रहिवाशी असलेल्या माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी एक अनोखी सुवर्णसंधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आमदार श्री. प्रकाश दादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कलागुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुमच्या टॅलेंटवर आकर्षक बक्षिसांचा वर्षाव करत तुम्हाला प्रेरणा देण्याचा आमचा मानस आहे. प्रथम क्रमांकास स्कूटर, द्वितीय क्रमांकास ड्रोन आणि तृतीय क्रमांकास सॅमसंग गॅलेक्सी टॅब तसेच उपविजेत्यांना भरगोस बक्षिसे देण्यात येणार आहेत.