पुणे गँगरेप प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, CCTV लागलं हाती; तिन्ही आरोपी रस्त्यावर...
पुण्यातील बोपदेव (Bopdev) घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhava Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यादरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. एका सीसीटीव्हीत आरोपी कैद झाले असून, हे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलं आहे. याआधी पोलिसांना आरोपींचं स्केच जारी केलं असून, नागरिकांना ते दिसल्यास माहिती देण्याचं आवाहन केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मित्रांसोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा घाटात गेलेल्या दोघांजवळ तीन तरुण आले. सुरुवातीला त्यांनी मानवधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. नंतर तरुणीचे अपहरण करण्यात आले. तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी ज्या मार्गावर ही घटना घडली तेथून जाणाऱ्या सर्व संशयित वाहनांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांना एका दुचाकीवरुन तिघे प्रवास करत असल्याचं दिसलं. घटनेत तीन आरोपी असल्याने पोलिसांचा संशय बळावला. सीसीटीव्हीत ते एका ठिकाणी थांबले असल्याचं दिसत आहे. आता पोलीस वाहनाच्या आधारे त्यांची माहिती मिळवत आहेत.
पीडित तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवले वाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी 10 पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केले आहेत. www.cmmnews.in
info@cmmnews.in