फुटपाथवर झोपलेल्या इसमाच्या डो काम करण्याची बॅग चोरल्याच्या संशयावरुन -: प्रेस नोट:-
दिनांक २६/०८/२०२४
फुटपाथवर झोपलेल्या इसमाच्या डोक्यात हातोडीने मारुन त्याचा खुन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या
आरोपीतास अटक करून गुन्हा उघडकीस आणलेबाबत...
कांदिवली पश्चिम एम.जी.रोड, येथील पुर्वीका मोबाईल शॉपी जवळ दुकानासमोर झोपलेल्या
कलुवा नावाच्या इसमास मनोज नावाच्या इसमाने दिनांक १९/०८/२०२४ रोजी ००:३० वा. ते ००:३५
वा. च्या सुमारास त्याची मिस्त्री काम करण्याची बॅग चोरल्याच्या संशयावरुन जीवे ठार मारण्याच्या हेतूने
त्याच्या डोक्यावर व तोंडावर हातोडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. सदर बाबत कांदिवली पोलीस
ठाणे येथे गुन्हा नोंद क्र. ७४५ / २४ कलम १०९ भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी मनोज या व्यतिरीक्त अन्य कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने
आरोपीचा शोध घेण्याकरिता मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पोलीस ठाणे स्तरावर विविध
पथके निर्माण करण्यात आली. यातील पाहिजे आरोपी हा फक्त दोन दिवसापासुन कांदिवली पश्चिम
परिसरात पाहिला गेला असल्याने व तो मोबाईल वापरत नसल्याने तसेच त्याचे राहण्याचे ठिकाण नसल्याने
त्याचा शोध घेण्याकामी पोलीस ठाणे हद्द परिसरातील तसेच कांदिवली (पूर्व) परिसरातील आरोपीताची
वावर असलेली विविध ठिकाणे गोपनिय चौकशी करुन आरोपीताच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक इसमाकडे
बारकाईने तपास करुन आरोपीताची नाव मनोज शिवनाथ सरोज, वय ४५ वर्षे असल्याचे निष्पन्न करण्यात
आले.
आरोपीताचा कोणताही नातेवाईक व मित्र तसेच नेहमी त्याचेसोबत काम करणारा इसम नसतानाही
सदरच्या आरोपीताचा कांदिवली पोलीस ठाणेच्या पथकाने दहिसर ते गोरेगाव पर्यंत बिगारी काम करणाऱ्या
तसेच फुटपाथवर झोपणाऱ्या इसमांकडे चौकशी करुन आरोपीताचे मुळ गाव बेलवा बंकट, जिल्हा
वाराणसी, राज्य - उत्तर प्रदेश हे निष्पन्न केले. त्याचा शोध घेणेकामी पो.उ.नि. नितीन साटम व पथक हे
आरोपीताच्या मुळगावी पाठविण्यात आले. सदर ठिकाणी तो गावात आल्याची गोपनिय माहिती प्राप्त करुन
त्यास अटक करुन मुंबईमध्ये आणण्यात आले.
आरोपीतास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, १७ वे न्यायालय, बोरीवली मुंबई यांचे समक्ष हजर
करण्यात आले असुन मा. न्यायालयाने त्यास दिनांक २९/०८/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर
केलेली आहे.
-
११,
सदर कारवाई श्री. सत्यनारायण चौधरी, सह पोलीस आयुक्त (का व सु) श्री. राजीव जैन, अपर
पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई, श्री. आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ
मुंबई व शैलेंद्र धिवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली श्री.
ज्ञानेश्वर गणोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांदिवली पोलीस ठाणे, मुंबई व पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंद
कांबळे, यांचे प्रत्यक्ष देखरेखीखाली सहा. पोलीस निरीक्षक सोहन कदम, सहा. पोलीस निरीक्षक श्री हेमंत
गीते व पोलीस उप निरीक्षक दिपक पाटील, पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत मगर, पोलीस उप-निरीक्षक
नितीन साटम आणि पोलीस उप निरीक्षक मनोज गदळे, तसेच सफौ गोटमुखले, पोहक्र. सत्यवान जगदाळे,
श्रीकांत तावडे, वामन जायभाये, राजेश गावकर, शरद गावकर, शिवाजी नारनवर, पोशिक्र. सुजन केसरकर,
योगेश हिरेमठ, स्वप्निल जोगलपुरे, चिरंजीवी नवलु, प्रविण वैराळ, परमेश्वर चव्हाण, जनार्दन गवळी,
प्रशांत कुंभार व दादासाहेब घोडके यांनी पुर्ण केलेली आहे.